Vinayakrao B Patil Junior College

सूचना :

उत्कृष्ट निकालाची परंपरा

ई- अध्यापन साहित्य

प्रशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग

अध्यापनात सोशल माध्यामांचा समावेश

संस्थेविषयी थोडक्यात

तसेच संस्थेने कृषी माहिती व व्यापार तंत्रज्ञान महाविद्यालय (स्थापना- २००७-०८) मध्ये विविध प्रकारचे १० कौशल्यवृध्दीव्दारे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे शासनमान्य पार्टटाईम प्रशिक्षण ६ महिन्याचे कृषी विभागांशी निगडीत कोर्स प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेता येईल. संस्थेच्या कृषी शासनमान्य प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेतल्यास त्याला संस्थेच्या योजनेच्या आधारे इ. ११वी व इ.१२ वी उत्तीर्ण मुलांना रोजगार- स्वंयरोजगार देण्यात येणार असून आदिवासी भागातील मुलांचे राहणीमान सुधारून आर्थिक लाभ मिळणार आहे. असे दोन्ही शैक्षणिक लाभ प्रवेशार्थांना मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जूलै २००८ मध्ये संस्थेस विनायकराव बीपाटील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्याल (वि. अ.) तत्वावर मान्यता देण्यात  आली असून विद्यार्थी इयत्ता ११वी / १२वी कला व वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे. तसेच संस्थेने विनायकराव बीपाटील व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी महाविद्यालय सन २०१२-१३ संस्थेने व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे २ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठीचे + २ स्तराची समकक्षतेचे ६ व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी अभ्यासक्रम सुरू केले आहे. याव्दारे आपल्याला रोजगार-स्वंयरोजगाराच्या हमीवर शासनमान्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उपलब्ध अभ्यासक्रम

११ वी कला (Arts)

इ.१२ वी कला (Arts)

११वी वाणिज्य (Commerce)

इ.१२ वाणिज्य (Commerce)

BA MMC (मल्टीमीडिया)

BSc Hotel Management

सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग अँड कटिंग (बेसिक फॅशन डिझाईन कोर्स)

Vinayakrao B Patil

संस्थापकांच्या डेस्कवरुन

एखादा स्वप्न पाहणं ते फुलवणं व फुलवण्यासाठी करण्यात येणाऱ्या धडपडीतला आनंदही जगा वेगळा असतो” सन 1999 मध्ये स्थापित इंडो इस्रायली ॲग्रो इंडस्ट्रीज चेंबर संस्था कला-कौशल्य, कृषी, तांत्रिक क्षेत्रात पाऊल ठेवत शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ते स्वप्न आणण्यासाठी धडपडणार्‍याला आनंद मिळवून देण्यासाठी संस्थेने महाराष्ट्रभर विविध शाखेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना कौशल्य धारक होण्यासाठी संस्था सतत प्रयत्न करत आहे. बदलत्या काळानुरूप आपण बदलले पाहिजे आणि हा बदल स्वतः करणे व स्वतःपासून करणे आवश्यक आहे. संस्था त्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे व विद्यार्थी त्या संधीचे सोने करत आहे हे स्वप्न रोजगार प्राप्त धारकांच्या स्वरूपात वावरतांना / जीवन जगताना दिसून येत आहे हेच संस्था-पालकांचे स्वप्नपूर्ती स्वप्नपुर्ती होय.

– मा.श्री. विनायकराव भुसारेपाटील (संस्थापक अध्यक्ष)

विद्यार्थ्यांचे मनोगत

Director Abhaysinh Patil

संचालकांच्या डेस्कवरुन

प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग आणि समाजातील हितचिंतक,

आपले Vinayakrao B. Patil Junior College of Arts, Commerce & Science या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर मनःपूर्वक स्वागत आहे.

आमचे महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कार, मूल्ये आणि प्रगती यांचे संगमस्थान आहे. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर जीवनासाठी सक्षम बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. “शिक्षणातून संस्कार, संस्कारातून यश आणि यशातून समाजसेवा” हे आमचे मार्गदर्शक तत्त्व आहे.

या शैक्षणिक वर्षात हॉटेल मॅनेजमेंट (BHM/Hospitality) आणि बी.एम.एम.सी. (Mass Media and Communication) हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले असून, हे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन संधींचे दार उघडतात. तसेच अकरावी–बारावी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत एमएस-सीआयटी आणि बेसिक फॅशन डिझायनिंग कोर्सची सुविधा उपलब्ध आहे. या प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्य, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टीकोन विकसित होतो.

आमचा शिक्षकवर्ग समर्पित आणि मार्गदर्शक असून, तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षणात आधुनिकता आणण्यासाठी स्मार्ट क्लासरूम, आयसीटी-आधारित शिक्षण व ई-कंटेंट चा वापर केला जातो.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, महिला सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवले जातात.

पालक आणि समाजाचे सहकार्य हेच आमचे बळ आहे. शिक्षण हा विद्यार्थी–पालक–शिक्षक–समाज या चौघांचा सामूहिक प्रवास आहे. आगामी काळात आम्ही रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, करिअर गाईडन्स व डिजिटल ट्रेनिंग मॉड्युल्स सुरू करण्यास कटिबद्ध आहोत.

प्रिय विद्यार्थ्यांनो,

प्रत्येक दिवस हा शिकण्याची नवी संधी आहे. मेहनत करा, जिज्ञासू राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा—कारण “शिक्षण हीच खरी शक्ती आहे जी जीवन बदलते आणि समाज घडवते.”

मनःपूर्वक शुभेच्छांसह,

– मा.श्री. अभयसिंह भुसारेपाटील (संचालक)

Our Gallery

शिक्षणातून संस्कार, संस्कारातून यश आणि यशातून समाजसेवा.

Scroll to Top